Ed Sheeran Arijit Singh : लोकप्रिय हॉलिवूड सिंगर एड शीरन भारतात आला आहे. एडी शीरनची भारतातही खूप जास्त लोकप्रियता आहे. तो इतका मोठा गायक असला तरी देखील सर्वसाधारण आयुष्य जगताना दिसतो. सध्या भारतात तो त्याच्या मॅथमॅटिक्स टूरसाठी आला आहे आणि त्यानं बंगळुरुमध्ये 2 शो परफॉर्म देखील केलं. आता अरिजीत सिंगसोबतचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्याला पाहून सगळ्यांना देखील आश्चर्य झालं.
खरंतर एड शीरन आणि अरिजीत सिंग हे दोघेही सर्वसामान्यांसारखे राहतात. ते दोघं कितीही मोठे सेलिब्रिटी असले तरी सुद्धा त्यांच्या वागण्यात तसं काही दिसून येत नाही. सध्या त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एड शीरनला घेऊन अरिजीत सिंग हा फिरताना दिसला. दोघांसोबत त्यासोबत सिक्योरिटी देखील नव्हती. अरिजीत स्कूटी चालवत होता तर एडी शीरन हा त्याच्या मागे बसला होता.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकत्र 5 तास घालवले. त्यांनी या 5 तासात खूप मज्जा केली. शिबताला घाटात दोघांनी मर्चेंडाइजज बोट घेतली आणि एक तास राइडचा आनंद घेतला. त्या एरियाचे डीआयजीनं सांगितलं की एड शीरन बंगळुरुमध्ये आहे आणि त्यानं अनेक एक्स्ट्रा सिक्योरिटीची मागणी केली नाही.
हेही वाचा : 'या' अभिनेत्यासाठी एटलीने सलमान खानला ठेवलं होल्डवर? 500 कोटींच्या सिनेमाचं भविष्य अंधारात?
या आधी एडनं बंगळुरुच्या चर्च स्ट्रिटमध्ये विना कोणती घोषणा करता परफॉर्म करण्यास सुरुवात केली. त्या दोघांच्या परफॉर्मन्समध्ये पोलिसांनी त्याला थांबवलं. या सगळ्याचा एड शीरनाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर त्यानंतर स्वत: एडीनं त्याच्याकडे परवानगी असल्याचं सांगितलं. एडनं या आधी हैदराबाद आणि चैन्नईमध्ये परफॉर्म केलं होतं. तिथे त्यानं ए आर रहमाननं या दरम्यान, उर्वशी गाण गायलं, आता एड 12 फेब्रुवारी शिलॉन्गमध्ये परफॉर्म करणार आहे आणि 15 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या एनसीआरमध्ये आहे.