मुंबई : जगभरातल्या बाजारातली मंदी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. दिल्लीतल्या बाजारामध्ये सोन्याचे दर ७० रुपयांनी घटले आहेत. सोन्याचा आजचा दर ३२,१३० रुपये प्रती तोळा एवढा आहे. तर चांदीचा भाव २५० रुपये किलोनी घटला असून ४०,२५० रुपये प्रती किलो झाला आहे. डॉलरची मजबुती, जगातल्या बाजारतली मंदी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची कमी मागणी असल्यामुळे हे दर घटल्याचं व्यापारी म्हणाले आहेत.
सोन्याच्या ८ ग्रॅम नाण्यांच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३२,१३० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१,९८० रुपये प्रती तोळा एवढी आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या नाण्यांची किंमत २४,८०० रुपयांवर कायम आहे. चांदीच्या नाण्यांच्या किंमतीमध्ये प्रती शेकडा १ हजार रुपयाची घट झाली आहे. चांदीच्या नाण्यांचे दर लिवाल ७५ हजार रुपये आणि बिकवाल ७६ हजार रुपये प्रती शेकडा आहेत.