Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. बुधवारी मौल्यवान धातुच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जरी वाढले असले तरी त्या तुलनेने वायदे बाजारात सोन्याचे भाव उतरले आहेत. कॉमेक्सवर सोनं 15 डॉलरने 2665 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहेत. तर चांदी सलग चौथ्या दिवशी मजबूत झाली असून 30 डॉलरच्या वर कायम आहे. घरगुती बाजारात सोनं 110 रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळं 24 कॅरेट सोन्याचे दर 78,820 रुपये प्रति तोळा पोहोचले आहे.
या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात अधिक वाढ होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जगभरातील घडणाऱ्या घटनांचाही त्यावर परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री सुरू राहिल्याने विदेशी बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने सराफा किमतीत वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून 78,820 रुपये प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून 78,820 रुपये प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 72,250 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 90 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 59,120 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 72, 250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 78, 820 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,120 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,225 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,882 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 912 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,800रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,056रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 47,296 रुपये
22 कॅरेट- 72, 250 रुपये
24 कॅरेट- 78, 820 रुपये
18 कॅरेट- 59,120 रुपये