सोने पुन्हा झाले स्वस्त

स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.

Updated: Jul 14, 2017, 05:05 PM IST
सोने पुन्हा झाले स्वस्त title=

नवी दिल्ली : स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर ६०० रुपयांनी कमी होत ते प्रति किलो ३७,४०० रुपयांवर पोहोचले. 

दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २८,८६० आणि २८,७१० रुपये प्रति तोळा इतके होते. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात २७० रुपयांची वाढ झाली होती.