महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; एका तोळ्याचे भाव जाणून घ्या!

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत दर जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 2, 2024, 12:31 PM IST
महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; एका तोळ्याचे भाव जाणून घ्या! title=
gold silver price today 2nd december 2024 mcx gold and silver price drops in mumbai maharashtra

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी 2 डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मौल्यवान धातुच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 20 डॉलरची घरसण होऊन 2660वर पोहोचले होते. तर, चांदी 2 टक्क्यांनी घसरून 31 डॉलरवर पोहोचली आहे. 

MCXवर आज 24 कॅरेट सोन्याच्या दर 650 रुपयांनी घसरला आहे. तर चांदी 831 रुपयांनी घसरून 88,050 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. विदेशातील सकारात्मक कल आणि स्थानिक बाजारात मागणी वाढली आहे, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 77,350 रुपयांवर स्थिरावले आहेत. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली असून 70,900 रुपयांवर स्थिरावली आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 77,350 आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घट होऊन 58,010 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70, 900 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77, 350 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 010 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,090 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,735 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 801 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,720 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,880 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,408 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-70, 900 रुपये
24 कॅरेट- 77, 350 रुपये
18 कॅरेट- 58, 010 रुपये