Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील.

Updated: Feb 9, 2023, 05:01 PM IST
Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण title=

Google Map Wrong Way : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला कुठेही जायचे असल्यास अथवा कोणत्याही दिशेने पोहोचायचे असल्यास आपण गुगल मॅपचा (Google Map) सर्रास  वापर करतो. मात्र हेच गुगल मॅप तंत्रज्ञान वापरणं काही तरूणांना महागात पडले आहे. कारण हे तरूण गुगल मॅपच्या आधारे रस्त्याने जात असताना थेट जाऊन खोल दरीत कोसळले आहेत. या घटनेने तरूणांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील. नागरीकांसाठी इतकं फायदेशीर असणार हे गुगल मॅप अनेकदा त्यांच्या जीवावर सुद्धा बेतले आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. 

नेमकी घटना काय? 

दिल्लीतील दोन तरूण (Two tourist) पर्यटनाला निघाले होते. या तरूणांना विष्णुप्रयागला जायचे होते. त्यामुळे त्यांनी गुगल मॅपवर (Google Map) जाऊन रस्ता शोधला होता. या मॅपवर त्यांना एक शॉर्टकट मार्ग दाखवला होता. हा शॉर्टकट मार्ग त्यांनी स्विकारला होता. मात्र पुढे जाऊन ते दरीत कोसळ्याची घटना घडली होती. 

त्याचं झालं असं की, विष्णुप्रयागला जाण्यासाठी तरूणांनी गुगल मॅपच्या (Google Map) आधारे शॉर्ट कट मार्ग स्विकारला होता. तरूण पायीच या दिशेने निघाले होते. मात्र वाटेत त्यांना एक पुल लागला होता. हा पुल तूटलेला होता. मात्र याची कल्पना तरूणांना नव्हती.त्यामुळे ते थेट चालत निघाले होते. मात्र पुलाच्या थोड्या दुर पोहोचल्यानंतर ते थेट नदीत कोसळले होते.

अशी घटना उजेडात आली

तरूण दरीत कोसळल्याची घटना काही स्थानिकांनी पाहिली होती.त्यामुळे त्यांनी एनडीआरएफला याबाबत माहिती दिली होती. या माहितीनंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही तरूणांना दरीतून बाहेर काढले.  या मोठ्या अपघातातून ते बचावले आहेत की नाही, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. 

दरम्यान तुम्हीही जर अशाप्रकारे गुगल मॅपचा (Google Map) आधार घेऊन प्रवास करत असाल, तर तो मार्ग प्रवास करण्यासारखा आहे की नाही याबाबत स्थानिकांकडून खात्री करून घ्या. आणि मगच नंतर प्रवास करा. नाहीतर तुमच्याही जीवावर बेतू शकतं.