नवी दिल्ली : लग्नाचा सीझन सुरू आहे. कोणी घोडीवर तर कुणी गाडीत तर कुणी हेलिकॉप्टरमधून नवऱ्या मुलीला घेऊन जाणाऱ्यासाठी नवरदेवांची चर्चा झाल्याचं पाहिलं असेल. त्याचे व्हिडीओही समोर आले. पण सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे नववधूला आणण्यासाठी पतीनं थेट JCB च आणला आहे.
बर्फवृष्टी आणि पाऊस हा वऱ्हाडींसमोर अडथळा ठरला तेव्हा चक्क नवरदेव JCB घेऊन वधूला आणण्यासाठी पोहोचला. लग्नाचे सर्व विधी सासरच्या घरी पोहोचताच पार पडले आणि नंतर वर वधूसह घरी परतले. तुम्हाला असं वाटत असेल की हे सिनेमातच होऊ शकतं तर नाही हे प्रत्यक्षात घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवरदेवाला जेसीबी घेऊन वधूच्या JCB घेऊन जाण्याची गरज पडली. बर्फवृष्टीमुळे वर JCB घेऊन थेट लग्नासाठी पोहोचला. ही घटना रविवारी गिरीपार भागातील संग्रा गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी सकाळी संग्राहून रतवा गावाकडे मिरवणूक निघाली. त्याचवेळी बर्फवृष्टीमुळे मिरवणूक दल्यानूपर्यंतच जाऊ शकली.
Because of heavy Snowfall going on in Himachal,a barat was ferried in Two JCB Machines in a Snow Bound are of Shimla district in Himachal ..Watch this video of Barat in JCBs ..Himachali Rocks pic.twitter.com/OU6hDDVQea
— Anilkimta (@Anilkimta2) January 24, 2022
बर्फामुळे पुढचा रस्ता बंद असल्याने तिथून पुढे जाणं अशक्य होतं. नवरदेव, त्याचे वडील आणि फोटोग्राफर असे या जेसीबीमध्ये बसून 30 किलोमीटर अंतर कापून लग्नासाठी पोहोचले. लग्नाचे विधी पूर्ण करून दोन तासांचा प्रवास 12 तासात पूर्ण करून सर्वजण घरी पोहोचले. बर्फवृष्टीमुळे वरात पोहोचण्यासाठी उशीर झाला. बर्फामुळे JCB चा जुगाड करण्याची वेळ नवरदेवावर आली.