कुशीनगर : Women Fell In Well In Kushinagar: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये (Kushinagar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. हळदी समारंभात (Haldi Ceremony) काही महिला विहिरीत कोसळल्यात. या अपघातात 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईंकाना चार लाखांची मदत देण्यात येणार आहे.
हळदीच्या विधीसाठी महिला विहिरीवरील जाळीवर उभ्या होत्या. अचानक विहिरीतील लोखंडी जाळी तुटल्याने महिला विहिरीत पडल्याने शोककळा पसरली. कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील नौरंगिया स्कूल टोला येथे हा भीषण अपघात झाला.
UP | 13 women have died. The incident occurred last night at around 8.30 pm in the Nebua Naurangia, Kushinagar. The incident happened during a wedding program wherein some people were sitting on a slab of a well & due to heavy load,the slab broke: Akhil Kumar, ADG, Gorakhpur Zone pic.twitter.com/VaQ8Sskjl2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 17, 2022
अपघाताची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्याचे त्यांना यावेळी निर्देश दिलेत.
कुशीनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले, विहिरीत पडून महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.