नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या यंदाच्या आर्थिक विकास दरामध्ये अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे.
चालू अर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा दर ७ टक्के राहिल असा अंदाज वर्षाच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. नोटबंदी आणि जीएसटी लागू झाल्यावर मात्र अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याचं आयएमएफनं म्हटले आहे.
त्यामुळे सुधारित अंदाजनुसार यंदा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहण्याची शक्यता आहे. जीएसटी आणि नोटबंदीचा निर्णय तात्पुरता असून आर्थिक सुधारणांच्या मार्गावर भारताने अशीच वाटचाल सुरू ठेवली तर पुढील तीन वर्षात विकासदराची घसरेली गाडी पुन्हा रुळावर येईल असंही आयएमएफने म्हटले आहे.