Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे.
आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत. विमा नियामक IRDAI ने आरोग्य विमा विकणाऱ्या कंपन्यांना तसेच निर्देश दिले आहेत. आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी ग्राहक माहिती पत्रक (CIS) ग्राहकांना समजावे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी, शर्थी सोप्या भाषेत असाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कठीण शब्द प्रयोगामुळे ग्राहकांना पॉलिसी समजत नाही, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.
विमा कंपन्यांनी पॉलिसीत दिलेल्या (आरोग्य विमा पॉलिसी) अटी ग्राहकांना सहज समजू शकतील, अशा लिहाव्यात, असे नियामकाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. पॉलिसीधारकाने खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अटी आणि नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. पॉलिसी दस्तऐवज कायदेशीर गुंतागुंतांनी भरलेला असल्याने, पॉलिसीची मूलभूत वैशिष्ट्ये होणे आवश्यक असते.
विमा कंपन्या आणि पॉलिसीधारक यांच्यात माहितीची स्पष्ट सांगितली जात नाही, अशा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर IRDAI हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे नवीन CIS स्वरूप 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. नवीन फॉरमॅट लागू करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत.
विमा कंपन्या, मध्यस्थ आणि एजंट यांनी पॉलिसीची कागदपत्रांचे स्पष्ट भाषेत आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. सर्व पॉलिसीधारकांना पॉलिसीची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी दिली जाईल.
पॉलिसीधारकाची इच्छा असल्यास, त्यांच्या स्थानिक भाषेत CIS प्रदान केले जावे.
CIS वर फॉन्ट आकार किमान 12 (एरियल) किंवा मोठा असणे आवश्यक आहे.
ग्राहक माहिती पत्रक (CIS) मधील सर्व फील्ड पूर्ण करणे आवश्यक आहे.
पॉलिसी दस्तऐवजाच्या फॉरवर्डिंग लेटरमध्ये CIS चा संदर्भ द्यावा.
आरोग्य विमा कंपन्यांनी पॉलिसीधारकाला CIS मिळेल याची खात्री करावी.