Stop Dogs from chasing bikes : सध्या कुत्रा मागे लागणे किंवा चावण्याच्या घटनांबाबत अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील, वाचल्या असतील. नुकतीच दिल्लीत लिफ्टमध्ये कुत्रा चावल्याची घटना ताजी आहे ( Delhi Dog Bite). केरळमध्येही कुत्रे मागे लागण्याच्या, चावण्याच्या घटना वाढतायत. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण पहिले असतील (Kerala Dog Bite Cases Increased) . कुत्रे मागे लागण्याचा कधीतर तुम्हीही अनुभव घेतला असेल. अनेकदा रात्री उशिरा घरी जाताना आपल्याला चोर किंवा दरोडेखोरांची जेवढी भीती वाटत नाही तेवढी भीती रात्री फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळक्यांची वाटते. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या मागे कुत्रे लागणार नाहीत(Tips to stop dogs running behind yur two wheeler). किंबवना मागे लागलेले कुत्रे आल्या पावली परत जातील.
रात्री उशिरा, रिकाम्या रस्त्यावरून तुम्ही दुचाकीने जात असाल आणि समोर कुत्र्यांची टोळकी दिसल्यास तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. (Dogs chase my bike, what should I do?) कुत्रे मागे लागलेत तर काय होईल या भीतीने तुम्ही गाडी जोरात पळवतात आणि मध्ये कुणीतरी येतं आणि अपघात होतो. मात्र ही परिस्थिती कशी हाताळायची याबाबत काही जबरदस्त टिप्स देणार आहोत.
ही ट्रिक वापरा, रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रा भुंकणार नाही
खरंतर कुत्रे मागे लागले की, लोकं जोरात गाडी पळवतात. परंतु याशिवाय या परिस्थीला कसं हाताळायचं हे अनेकांना माहिती नसतं. अशात या टिप्स तुम्हाला ठरतील फायद्याच्या.
यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुत्रे कधी मागे लागतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे( Know dog psychology). कुत्रे तुमच्यावर भुंकत तुमच्या मागे जेंव्हा लागतात तेंव्हा त्यांना धावती गोष्ट पकडायची असते (Why does my dog run behind my bike). अशात कुत्रा दिसल्यास सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजिबात घाबरू नका. (आतून घाबरला असाल तरीही चेहऱ्यावर भीती दिसू देऊ नका). तुमची सायकल किंवा गाडी फास्ट करण्याऐवजी स्लो करा आणि तिथून जा. तुम्ही गाडी थांबवली तर सर्वात उत्तम. कारण जशी तुम्ही गाडी थांबवाल तसे कुत्रे आल्या पावली परत जातात. असं केल्याने कुत्रे मागे लागणार नाहीत.
दुसरा उपाय म्हणजे रस्त्यावर कुत्र्यांची टोळकी दिसली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून ( Dont look at dogs) जा. अनेकदा आपण कुत्र्याला पाहतो आणि घाबरतो (Fear of dogs) आणि यानेच कुत्रे तुमच्या मागे लागतात.
how to stop dogs chasing bikes use two simple tpis and see results