मुंबई : Raj Thackeray Ayodhya Tour : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brij Bhooshan Sharan Singh ) यांनी माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी थेट राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनाच फोन केला. त्यावेळी योगींच्या सल्लाने आम्ही हे करत नाही तर आम्हीच त्यांना सल्ला देतो, असे सांगत मनसे कार्यकर्त्यावर ते संतापलेत. याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhooshan Sharan Singh) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही, असे भाजप खासदार म्हणाले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी आधी हात जोडून सर्व उत्तर भारतीयांची माफी मागावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून मुंबईत 'अयोध्या चलो'चे पोस्टर लावण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय या ऑडिओ क्लिपवरुन दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदारालाच थेट फोन करत मनसे कार्यकर्ता भिडला आहे. या खासदाराला मनसे कार्यकर्त्याने टोला लगावला आहे. त्यामुळे हा विरोध कायम राहिला तर मनसे अधिक आक्रमक होईल, असंच दिसून येत आहे.
मनसे कार्यकर्ता तुलसी जोशी यांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhooshan Sharan Singh) यांना फोन केला. यावेळी त्यांच्यात काही सेंकदाचे संभाषण झाले. नमस्कार. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. यानंतर बोलणारी व्यक्ती मी तुलसी जोशी बोलत आहे, असे सांगतो. मी राज ठाकरे यांचा छोटासा मनसे सैनिक आहे. माझे नाव तुलसी जोशी आहे. आपण प्रभू रामचंद्र अयोध्यामधून खासदार आहात. तुमचे स्वागत आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केले तर तुमचे नाव गिनिज बुकमध्ये, लिम्का बुकमध्ये तुमची नोंद होणार नाही. तुम्ही जे राज ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे, ते योगींच्या सल्ल्याने केले आहात का? तुमचा तसा स्वभाव नाही. मात्र, योंगीच्या सल्लाने तुम्ही बोलत आहात, असे बोलताच खासदार बृजभूषण यांनी स्पष्ट म्हणाले, योंगीकडून आम्ही सल्ला घेत नाही. योगींना जरुर पडली तर ते आमच्याकडून सल्ला घेतात. याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बृजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सल्ला दिला आहे. राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये. राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे.