मुंबई : सर्व नागरिकांना सॅलरी, रेंटल इनकम आणि व्यवसायातून होणारे उत्पन्न करप्राप्त असते. त्यासाठी उत्पन्नानुसार वेगवेगळे स्लॅब निश्चित आहेत. व्यक्तीचे उत्पन्न ज्या स्लॅबमध्ये असेल, त्या स्लॅबइतका कर सरकारला द्यावा लागतो. किरकोळ गुंतवणूकदारा, निवृत्त लोकं आपल्या बचतीच्या रक्कमेला शेअर्समध्ये गुंतवतात. परंतु अनेकदा त्यांना माहित नसते की, शेअर्समधून होणारा नफा करपात्र असतो की नाही. खरे तर शेअर्सच्या विक्री आणि खरेदीतून होणारा फायदा किंवा नुकसानीच्या आधारावर टॅख्स लावला जातो.
लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि लॉस
शेअर्सला खरेदी केल्यानंतर 12 महिन्यानंतर विकल्यास त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा लॉस म्हणतात. तसेच 12 महिन्यांच्या आत विकले जात असेल तर, त्याला शॉर्ट टर्म असे म्हणतात.
2018 च्या अर्थ संकल्पानंतर कोणताही शेअर मार्केट इक्विटी विक्रेता एक लाख रुपयांहून जास्तचे लॉंग कॅपिटल गेन मिळवत असेल तर त्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 10 टक्के टॅक्स लागतो.
शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन्सवर टॅक्स
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सवर 15 टक्के टॅक्स लागतो. टॅक्स स्लॅबनंतरही, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर 15 टक्क्यांचा स्पेशल टॅक्स रेट लागू होतो. परंतु तुमचे एकूण उत्पन्न अडिच लाखांहून कमी असेल तर, शॉर्ट टर्म गेन्सवर लागणाऱ्या करातून सूट मिळवण्यासाठी क्लेम करता येऊ शकतो.