नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अनेक देशांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सरकारच्या निर्णयाला नागरिकांनी पाठ दाखवल्याचे चित्र संपूर्ण देशात दिसत आहे. अतिशय भयानक अशी परिस्थिती असून देखील जनता अद्यापही गंभीर झालेली दिसत नाही.
देशातील तब्बल १९ राज्यामध्ये प्रदेशांमध्ये 'लॉकडाऊन' घोषित करण्यात आलाय. परंतु या आदेशाला नागरिकांनी हरताळ फासल्याचे दृश्य दिसून येत आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणी पोलिसांना या नागरिकांवर कारवाई करावी लागत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनीही नागरिकांवर आपल्या 'स्टाईल'ने कारवाई केलीय.
Madhya Pradesh: Police make people get clicked with pamphlets reading 'I'm enemy of society; I won't stay home' if they are found violating section 144 in Mandsaur. SP Hitesh Chaudhary says, "This is part of a social experiment to make people stay home". #Coronavirus pic.twitter.com/GMfzCEHJHb
— ANI (@ANI) March 23, 2020
उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी पुन्हा एकदा 'पब्लिक शेमिंग'चा मार्ग स्वीकारला आहे. पोलीस रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पकडून त्यांच्या हातात एक कागद देऊन त्यांचा फोटो क्लिक करताना दिसत आहेत.
'मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात राहणार नाही' असा मजकूर लिहीलेला फोटो ते रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांच्या हातात देत आहेत. शिवाय त्यांचे फोटो देखील काढत आहेत. त्यानंतर त्यांनी घरी जाण्यास बजावत आहेत.