भरलग्नात चिडलेल्या नववधूचं असं रुप पाहून तुम्हाला ही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जो एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधू लग्नात हाय वोल्टेज ड्रामा करताना दिसत आहे.

Updated: Mar 14, 2022, 04:26 PM IST
भरलग्नात चिडलेल्या नववधूचं असं रुप पाहून तुम्हाला ही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जो एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधू लग्नात हाय वोल्टेज ड्रामा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नववधूच्या नाटकामुळे भलताच व्हायरल झाला आहे. खरेतर लग्नाचा दिवस नववधू आणि वरासाठी महत्वाचा दिवस असतो. ज्यामुळे सगळेच आनंदी असतात. परंतु या लग्नात भलताच ड्रामा पाहायला मिळाला. काही सेकंदांच्या क्लिपमध्ये आपण पाहू शकता की वधू आणि तिचे कुटुंब स्टेजवरती उभे आहेत. परंतु नवरदेव मात्र स्टेजवर दिसत नाही.

त्यादरम्यान अचानक, वधूला काहीतरी राग येतो आणि ती रडायला लागते आणि जोर जोरात ओरडून डोक्याला हात लावून बसते. जे पाहून सर्वांनाच असा प्रश्न पडतो की, या नववधूला नक्की असं काय झालं असावं? 

मात्र, व्हिडीओ नीट पाहिल्यास तुम्हाला हे लक्षात येईल की, हे सीरियलचे शूटिंग आहे. शूटिंगच्या वेळी ही अभिनेत्री वधूच्या गेटअपमध्ये काम करत आहे आणि ती आपला डायलॉग बोलत आहे. या व्हिडीओला पाहून बरेच लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका यूजरने दावा केला आहे की, ही सीरियल 'उडारिया' आहे, ज्यामध्ये ही अभिनेत्री जस्मिनची भूमिका साकारत आहे. या व्हिडीओला 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. ती इन्स्टाग्रामवर themayankshow नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.