LPG Cylinder Price: गेल्या काही महिन्यात जीवनाश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. घरगुती स्वयंपाकाचा सिलिंडर देखील महागला आहे. देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशात गृहणींना बजेट सांभाळणं कठीण झालं आहे. पण आता गृहणींसाठी बजेट बातमी आहे. कारण तुम्ही पुढच्या महिन्यासाठी आगाऊ सिलिंडर बूक करण्याची तयारीत असाल तर ही बातमी वाचा. सरकारी कंपनीनं सामन्य नागरिकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. या योजनेंतर्गत स्वस्तात सिलिंडर मिळणार आहे. इंडेन कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 750 रुपयात गॅस सिलिंडर मिळणार आहे.
इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त 750 रुपये खर्च करावे लागतील. या सिलेंडरची खासियत म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. या सिलेंडरचे वजन देखील सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. लवकरच हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपोझिट सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस मिळतो. या कारणास्तव, या सिलिंडरची किंमत कमी आहे.
The all-new, rust-free composite #LPG cylinders from #Indane will add to the aesthetic appeal of your kitchen. Now available in all major cities. pic.twitter.com/HTkN2bt5Ox
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) August 23, 2022
सिलिंडरचे नवीनतम दर
14.2 किलो सिलिंडरचे दर काय आहेत?
या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत. सध्या हे सिलिंडर 28 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे, मात्र कंपनी लवकरच सर्व शहरांमध्ये हे सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे.