श्रीनगर: कश्मीरच्या त्राल इथल्या एका सरकारी शाळेत मुझफ्फर वानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुझफ्फर वानी म्हणजेच हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानीचे वडील. त्यांच्या हस्ते ध्वजारोह करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. दहशतवादी बुरहान वानीला 2016 मध्ये लष्कराने ठार केलं होतं. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर घाटीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
मुजफ्फर वानी हे पुलवामा येथील त्राल येथील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. एका सरकारी आदेशात सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण होईल आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. जम्मू-काश्मीरमध्ये 23,000 सरकारी शाळा आहेत. त्यापैकी काही शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला नाही.
श्रीनगरमध्ये 120 शाळांपैकी 3 शाळांमध्ये ध्वजारोहणं करण्यात आलं. सरकारने 15 ऑगस्ट निमित्त कोरोनाचे नियम पाळून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परवानगी दिली होती. यावेळी हिजबूलचा दहशतवादी बुरहान वानीचे वडील मुझफ्फर वानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.