नवी दिल्ली : चीनबरोबर सुरू असलेल्या तणावानंतर संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद म्हणजे डीएसीने 6 अपाचे हेलीकॉप्टर खरेदी करण्यासाठी 4168 कोटी रुपये मंजुर केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एएच-64- हेलीकॉप्टरसह भारत अमेरिकेकडून काही उपकरण, स्पेयर पार्ट्स, प्रशिक्षण आणि गोळा-बारुद देखील खरेदी करणार आहे.
डीएसीने युक्रेनकडून दोन गॅस टर्बाइन सेट्स देखील खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. हे गॅस टर्बाईन सेट रशियामध्ये भारतासाठी तयार करत असलेल्या दोन ग्रिगरोव्हिच जहाजांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. या गॅस टर्बाइन सेटची किंमत 490 कोटी रुपये आहे.
भारतीय सैन्यात अपाचे हेलीकॉप्टर सामील झाल्याने मोठी ताकद वाढणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीकोनातून पंजाबच्या पठानकोट एअरबेस आणि आसाम जोरहटमध्ये हे अपाचे हॅलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत. 2015 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 2.2 अब्ज डॉलरच्या करारासाठी मंजुरी दिली होती. ज्या अंतर्गत 22 अप्पे हेलीकॉप्टर अमेरिकेकडून विकत घेतले जाणार आहे. या हॅलिकॉप्टरमुळे चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताची ताकद आणखी वाढणार आहे.