भारतीय रेल्वेलाही भरावे लागते वीज बिल, 1 दिवसाचा खर्च ऐकून बसेल धक्का

रेल्वेत मोठ्या प्रमाणात दिवे, पंखे, चार्जिंग पाईंट, एसी इत्यादी गोष्टींसाठी वीज वापरली जाते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? की, तुम्ही वापरत असलेली ही वीज कशी मिळते आणि त्याचं वीज बिल रेल्वेला भरावं लागतं का?

नेहा चौधरी | Updated: Jan 6, 2025, 05:26 PM IST
भारतीय रेल्वेलाही भरावे लागते वीज बिल, 1 दिवसाचा खर्च ऐकून बसेल धक्का title=

Indian Railways : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क असून भारतात एक मोठी संख्या आहे, जे लोक आजही रेल्वेने प्रवास करतात. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायण्यासाठी रेल्वे ही सोयीची मानली जाते. बदलत्या काळानुसार रेल्वेचे चित्रही बदल आहेत. आज रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुख सुविधा देण्यात आलंय. भारतीय रेल्वे ही चार झोनमध्ये विभागलं गेलंय. मुख्य म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. रेल्वेतून फक्त मनुष्य प्रवास करत नाही. तर मालगाड्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसायही केला जातो. यामुळे भारताला रेल्वेतून आर्थिकदृष्ट्या मोठी ताकद मिळतेय. 

भारतात दररोज 1300 हून अधिक गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यातून धावतात, ज्यामध्ये हजारो आणि लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेष हंगामात आणि सणासुद्दीत रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जातात.  जेणेकरून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील.

यामध्ये व्हीआयपी ट्रेन, शताब्दी, राजधानी, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, लोकल, गुड्स ट्रेन इत्यादींचा समावेश आहे. लोक कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत रेल्वेने प्रवास करतात. या काळात त्यांना नवीन अनुभव मिळतो. जेव्हा कोणी रेल्वेने प्रवास करतो तेव्हा तो अनेक राज्यांमधून जातो. या काळात त्यांना विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. अनेक भाषा शिकण्याची संधी मिळेल. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली जवळून पाहण्याचीही संधी आहे.

तुम्ही जेव्हा रेल्वेतून प्रवास करता तेव्हा ही रेल्वे कोणी बांधली असेल. रेल्वे रुळ कसे बसवले असती यापैकी एक प्रश्न म्हणजे एका दिवसात रेल्वेचे वीज बिल किती येत असेल, असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?

 

हेसुद्धा वाचा - भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात

 

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे की सर्वसामान्यांप्रमाणेच रेल्वेलाही वीज बिल भरावं लागतं. अगदी उत्तम आणि हुशार विद्यार्थ्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर जाणून घेणं गरजेच आहे. 

किती बिल भरतं रेल्वे?

खरंतर, रेल्वे आणि रेल्वे स्थानकांसाठी भारतीय रेल्वेला प्रति युनिट 7 रुपये मोजावे लागतात. ट्रेनची एक बोगी दर तासाला अंदाजे 210 युनिट वीज वापरते. त्यानुसार 12 तासांत प्रति बोगी वीज खर्च 17,640 रुपये आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांसाठी, हा वापर सुमारे 120 युनिट प्रति तास असतो. त्यानुसार, 1440 युनिट विजेसाठी रेल्वेला 10,080 रुपये मोजावे लागतात. ट्रेनचा एकूण वीज खर्च प्रतिदिन 5,76,000 रुपयांच्या घरात आहे. जे भारतीय रेल्वेला भरावं लागतं. हाय टेंशन वायरच्या माध्यमातून दररोज 18.83 लाख रुपये खर्च होत असतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वे ट्रेनच्या डब्यात दोन प्रकारची वीज पुरवते. पहिली डायरेक्ट हाय टेंशन वायर आणि दुसरी पॉवर जनरेट केलेली आहे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की ट्रेनमध्ये जनरेटर कोच बसवलेला असतो, ज्यामध्ये डिझेलच्या माध्यमातून वीज तयार करण्यात येत असते.