मुंबई : Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत, रेल्वेचे तिकीट रद्द झाले असेल किंवा कोणत्याही कारणाने रद्द करावे लागले, तर परताव्यासाठी (IRCTC iPay Refund) खूप प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता ती करावी लागणार नाही. आता रेल्वे त्वरित Refundसाठी नवीन सेवा देत आहे. IRCTCने (Indian Railway Catering and Tourism Corporation) IRCTC-iPay नावाचे स्वतःचे पेमेंट गेटवे सुरू केला आहे.
ही सेवा (IRCTC iPay App) आधीच कार्यरत आहे. या अंतर्गत, तिकिट बुकिंगसाठी पेमेंट कोणत्याही बँकेच्या पेमेंट गेटवेवर केले जाते, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि तिकीट रद्द होताच, त्याचा परतावा (IRCTC iPay Refund Status) त्वरित तुमच्या खात्यात जमा होतो. IRCTC iPay वरून रेल्वे तिकीट बुक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. (IRCTC iPay Ticket Booking Process).
1. iPay द्वारे बुकिंगसाठी, प्रथम www.irctc.co.in वर लॉग इन करा.
2. आता प्रवासाशी संबंधित तपशील जसे की ठिकाण आणि तारीख भरा.
3. यानंतर, तुमच्या मार्गानुसार रेल्वे निवडा.
4. तिकीट बुक करताना, तुम्हाला पेमेंट पद्धतीमध्ये 'IRCTC iPay' चा पहिला पर्याय मिळेल.
5. हा पर्याय निवडा आणि 'पे अँड बुक' वर क्लिक करा.
6. आता पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI तपशील भरा.
7. यानंतर तुमचे तिकीट त्वरित बुक केले जाईल, ज्याचे कन्फर्मेशन तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल.
8. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात तुम्ही पुन्हा तिकीट बुक केल्यास तुम्हाला पेमेंट तपशील पुन्हा भरावा लागणार नाही, तुम्ही लगेच पैसे देऊन तिकीट बुक करू शकाल.
पूर्वी तिकीट रद्द केल्यावर परतावा मिळण्यास बराच वेळ लागायचा. मात्र आता हे पैसे लगेच खात्यात जमा होणार आहेत. IRCTC अंतर्गत, वापरकर्त्याला त्याच्या UPI बँक खाते किंवा डेबिटसाठी फक्त एक आदेश द्यावा लागेल, त्यानंतर पेमेंट इन्स्ट्रुमेंट पुढील व्यवहारांसाठी अधिकृत केले जाईल. अशा परिस्थितीत तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळही कमी असेल.
IRCTC अधिकार्यांनी सांगितले की, आधी कंपनीकडे स्वतःचे पेमेंट गेटवे नव्हते, नंतर दुसरा पेमेंट गेटवे (IRCTC iPay Means) वापरावा लागला. त्यामुळे बुकिंगला बराच वेळ लागयचा आणि जर पैसे कापले गेले तर खात्यात परत यायलाही जास्त वेळ लागत होता. पण आता ते होणार नाही. आयआयसीटीसीच्या पेमेंट गेटवेवरील पहिल्या प्रश्नावर अधिकारी म्हणतात की ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
अनेक वेळा तुम्ही तिकीट काढता पण तुमचे तिकीट वेटिंगमध्ये असते. (IRCTC iPay Features) आणि अंतिम चार्ट तयार झाल्यानंतर आपोआप तुमचे तिकीट रद्द होते. अशा परिस्थितीत आता या स्थितीतही तुम्हाला तुमचा परतावा त्वरित मिळेल.