मुंबई : Indian Railways: कोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामुळे रेल्वेला प्रवासी मिळेनासे झाले आहेत, म्हणून रेल्वे दररोज अनेक गाड्या रद्द करीत आहे. रेल्वेने बुधवारी पुन्हा अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. याची माहिती रेल्वेने ट्विटद्वारे दिली आहे. रेल्वेने यापूर्वी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात यासह अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तथापि, प्रवासी कामगारांना लॉकडाऊनमध्ये त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेनेही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत, जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये.
आपण रेल्वेने प्रवास करण्याचा कार्यक्रम आखत असाल तर आपली रेल्वे रद्द झाली नाही हे निश्चितपणे तपासा. जर आपण 16 मे पर्यंत कुठेतरी जाण्याचे ठरविले असेल तर रेल्वेची स्थिती तपासा, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये. उत्तर रेल्वेने ट्विटद्वारे या गाड्यांची माहिती दिली आहे. या गाड्या दिनांक 11 मे ते 16 मे दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्वसंबंधित को सूचित किया जाता है कि परिचालनिक कारणों से कश्मीर घाटी के बनिहाल-बारामूला सेक्शन में संचालित निम्नलिखित रेलगाड़ियों को दिनांक 11.05.2021 से 16.05.2021 तक निरस्त करने का निर्णय लिया गया हैः- pic.twitter.com/qCiLcluQw4
— Northern Railway (@RailwayNorthern) May 10, 2021
उत्तर रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की काश्मीर खोऱ्यातील बनिहाल-बारामुल्ला विभागातील 11 मे 2021 ते 16 मे 2021पर्यंत धावणाऱ्या खालील गाड्या परिचालन कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सर्वांना देण्यात आली आहे.
रेल्वे नंबर | रेल्वे | रद्द |
04613 | बनिहाल-बारामूला स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04614 | बारामूला-बनिहाल स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04617 | बनिहाल-बारामूला स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04618 | बारामूला-बनिहाल स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04619 | बनिहाल-बारामूला स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04620 | बारामूला-वडगाम स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
04622 | वडगाम-बनिहाल स्पेशल रेल्वे | 11 मे ते 16 मई 2021 पर्यंत रद्द |
कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण हेल्पलाईन नंबर 139 वर कॉल करु शकता. येथे आपल्याला सर्व माहिती मिळेल किंवा आपण www.enquiry.indianrail.gov.in वर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधू शकता.