नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त होण्याऱ्या देशव्यापी कार्यक्रमात इतर देशांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. मात्र भारताने पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून १० देशांच्या अध्यक्षांना एकत्र आमंत्रित केले आहे.
१९५० साली भारताने पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला. १९५५ मध्ये राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भारताने पाकिस्तानचे तत्कालीन गर्व्हनर जनरल मलिक गुलाम अहमद यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यापूर्वी १९५० मध्ये इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. १९५१ मध्ये भुतानचे तत्कालीन राजा त्रिभूवन वीर विक्रम शाह यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. १९५२ आणि १९५३ मध्ये भारताने प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले नव्हते. तर १९५४ मध्ये प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी भुतानचे नरेश दोर जी वानचुक प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
१९५० आणि १९५४ च्या मध्ये भारतात प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम करण्यासाठी एक निश्चित स्थान ठरवण्यात नव्हते आले. सुरूवातीला कार्यक्रम लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅप आणि रामलीला मैदानात आयोजित करण्यात येत होते. १९५५ मध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी राजपथ हे स्थान निश्चित करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत प्रजासत्ताक दिन हा राजपथावर साजरा करण्यात येतो.
२६ जानेवारी १९५० च्या सकाळी १०-१८ मिनिटांनी भारताचे संविधान लागू करण्यात आले. यानंतर काहीच मिनिटांनी म्हणजे १०-२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.