IIT Bombay: भारतातीलच नव्हे तर जगातील टॉप क्लास इंजिनीयरिंग कॉलेजच्या यादीत IIT मुंबईचा सामवेश आहे. इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर आणि नॉन एग्जीक्यूटिवचे चेयरम नंदन नीलकेणी (Infosys co-founder Nandan Nilekani) यांनी IIT मुंबईला 315 कोटी दान केले आहेत. IIT मुंबईला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही अनोखी भेट दिली आहे. नंदन नीलकेणी हे IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थ्याने दिलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डोनेशन आहे.
नंदन नीलकेणी यांना इंजिनियरीगमध्ये करिअर करायचे होते यासाठी त्यांनी IIT मुंबई मध्ये प्रवेश घेतला. नंदन नीलकेणी यांनी 1973 मध्ये IIT मुंबई येथून 1973 मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली. IIT मुंबई येथून पास आऊट होवून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची डिग्री मिळवून 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नीलकेणी यांनी IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे.
आयटी बॉम्बेचे संचालक प्राध्यापक सुभाषिस चौधरी आणि नंदन नीलकेणी यांनी बेंगळुरू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ट्विट करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी नीलकेणी यांनी 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. आयआयटी बॉम्बे हा माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. ही देणगी म्हणजे पकतफेड आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. विद्यार्थ्यांना उतत्म दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही देणगी दिल्याचे नीलकेणी यांनी सांगितले.
To mark 50 years of my association with @iitbombay, I am donating ₹315 crores to my alma mater. I am grateful to be able to do this
Full release: https://t.co/q6rvuMf2jn pic.twitter.com/f8OEfZ1UTq
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 20, 2023
यापूर्वी देखील नीलकेणी यांनी आयआयटी बॉम्बेला 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या दोन्ही देणग्या मिळून एकूण 400 कोटींचे डोनेशन त्यांनी IIT मुंबईला दिले आहे. एखाद्या माजी विद्यार्थ्याने त्याच्या संस्थेला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
नंदन नीलकेणी यांनी 1999 ते 2009 पर्यंत आयआयटी बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशनच्या बोर्डावर काम केले. 2005 ते 2011 पर्यंत ते प्रशासक मंडळावर होते. 1999 मध्ये प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर, 2019 मध्ये, त्यांना IIT बॉम्बे दीक्षांत समारंभात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.