मुंबई : पैसा वाढवण्यासाठी पैसा हा गुंतवावाच (Investment Tips) लागतो. तो बँकेत (Bank) ठेवून वाढत नसतो, याउलट तो जास्त खर्च होत असतो. त्यामुळे अनेकजण पैसा गुंतवण्याचा (Investment Tips) विचार करतात. मात्र पैसा गुंतवला तर नुकसान होण्याच्या भीतीपाई अनेकजण पैसा गुंतवण्यास घाबरतात. मात्र काही असे पर्याय देखील आहेत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि यात कमी रिस्क देखील आहे. दरम्यान हे पर्याय काय आहेत, ते जाणून घ्या
शेअर बाजारात (Share market) खूप रिस्क देखील आहे. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करून खूप चांगला नफा देखील मिळवता येतो. शेअर बाजारात थोडी गुंतवणूक करून, तुमची बचत चांगल्या शेअर्समध्ये ठेवता येते आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता येते.
गोल्डमध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा चांगला पर्याय आहे. गोल्डच्या दरात नेहमीच वाढ होताना दिसत आहे.गोल्डमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण गोल्डमध्ये गुंतवणूक करणे ही नेहमीच फायद्याची बाब असल्याचे सिद्ध झाले आहे. गुंतवणुकीसाठी गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला परतावा देखील मिळू शकतो.
चांदी हे गुंतवणुकीचेही (Silver Investment) उत्तम माध्यम आहे. चांदीच्या दरातही बरेच चढ-उतार पाहायला मिळतात. तथापि, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदी हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम ठरू शकते.चांदीची किंमत वेळोवेळी वाढू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीने तुमची बचत चांदीमध्येही गुंतवता येते.
(डिस्कलेमर: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. झी 24 तास तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)