Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details

IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.   

श्वेता चव्हाण | Updated: Jan 24, 2024, 01:18 PM IST
Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details title=

IRCTC Tour Package Valentine Day News in Marathi: फेब्रुवारी महिना म्हटलं की सर्वांना आठवतो तो म्हणेज ‘व्हॅलेंटाईन डे’.  कारण या दिवशी अनेक जोडीदार आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यामुळे प्रेमाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याचं विशेष महत्त्व आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर फेब्रुवारी महिना म्हणजे एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा महिना असतो. 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. IRCTC तुमच्यासाठी एक हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये 3 रात्री आणि 4 दिवस फिरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

आयरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला पटाया आणि बँकॉक फिरण्याची संधी आहे. हे पॅकेज टूर 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून संपूर्ण पॅकेजसाठी तुम्हाला अंदाजे 48,470 रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये रहाने, फ्लाइट तिकीट, जेवण इत्यादी अनेक सुविधा मिळतील. तसेच हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे. 

टूर पॅकेजसाठी किती असेल खर्च?

जर तुम्ही या ट्रिपला एकटे जाणार असाल तर तुम्हाला 56,845 रुपये खर्च करावे लागतील. जर जोडीदारासोबत जाणार असाल तर प्रत्येकी एक 48,470 रुपये खर्च होईल. याशिवाय तुम्ही तीन लोकांसोबत जाणार असाल तर प्रत्येकी एक 48,470 रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये मुलांसाठी बेडसह 46,575 आणि बेडशिवाय रु. 41,550 रुपये खर्च येईल. 

टूर पॅकेज बद्दल थोडक्यात माहिती....

पॅकेजचे नाव - Treasures Of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad (SHO12)
पटाया आणि बँकॉक
तारीख- 14 फेब्रुवारी 2014
टूर कालावधी- 4 दिवस/3 रात्री
जेवण - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
प्रवास - फ्लाइट
विमानतळ/ निघण्याची वेळ- हैदराबाद विमानतळ/00:45 AM