अवकाशात कशी झाली डॉकिंग? साऱ्या जगानं पाहिली ISRO ची कर्तबगारी; पाहा भारावणारा Video

SPADEx Video: अवकाश क्षेत्रात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची उल्लेखनीय कामगिरी. आव्हानात्मक मोहिमेचा महत्वाचा टप्पा फत्ते. पाहा Video   

सायली पाटील | Updated: Jan 18, 2025, 08:13 AM IST
अवकाशात कशी झाली डॉकिंग? साऱ्या जगानं पाहिली ISRO ची कर्तबगारी; पाहा भारावणारा Video  title=
ISRO space docking SPADEx experiment detailed video shared on social media

ISRO Space Docking: अंतराळ क्षेत्रात रशिया, चीन, अमेरिका यांसारख्या राष्ट्रांचा दबदबा असतानाच भारतही या शर्यतीत मागे राहिलेला नाही. मागील काही वर्षांमध्ये भारतातूनही अनेक अशा मोहिमा राबवण्यात आल्या आहेत जिथं अंतराळातील मोहिमांना यश देत देशातील अंतराळ संशोधन संस्थेनं नवनवी यशशिखरं सर केली आहेत. गुरुवारीसुद्धा देशातील अतीव महत्वाच्या संस्थेनं असाच एक क्षण अनुभवला. 

ISRO नं गुरुवारी स्पेडेक्सच्या मदतीनं (Space Docking) स्पेस डॉकिंग या प्रयोगाअंतर्गत यशस्वीरित्या दोन उपग्रहांना डॉक केलं अर्थात जोडलं. अवकाळाता यशस्वीरित्या दोन उपग्रह जोडणारा भारत हा आता जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी ही कमाल केली आहे. इस्रोनं एका व्हिडीओच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Wetaher News : थंडीनं मारली दडी, आठवडी सुट्ट्यांच्या मुहूर्तावर कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त 

इस्रोनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार 'चेजर' आणि 'टार्गेट' हे उपग्रह एकमेकांशी जोडले जात असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. डॉकिंग केल्यानंतर दोन्ही उपग्रहांवर नियंत्रण स्थापित करण्यात आलं. खुद्द इस्रो प्रमुख वी. नारायणन यांनी या मोहिमेत यश मिळाल्याची माहिती देत संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या. 

पाहा डॉकिंग प्रक्रियेचा भारावणारा व्हिडीओ... 

इस्रोची ही मोहिम इतकी महत्त्वाची का?

 इस्रोच्या या डॉकिंगमुळं भविष्यातील विविध अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचा टप्पा सर करण्यात आला आहे. चंद्रयान 4, गगनयान, स्पेस स्टेशनची स्खथापना आणि थेट चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्यासाठीचे इस्रोचे प्रयत्न आणि भविष्यातील या मोहिमांसाठी सध्याची मोहिम मोठा हातभार लावताना दिसेल. 

2035 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं देशाचं Space Station स्थापित करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून, त्या दृष्टीकोनातून तयारीही सुरु करमअयात आली आहे. याच मार्गावर स्पेडेक्ससारख्या मोहिमांमध्ये मिळणारं यश देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यास आणखी हातभार लावताना दिसेल.