जम्मू : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दुरु अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झालीय. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
यांत हिजबुलचा कमांडर अशरफ मौलवीचा खात्मा करण्यात आलाय. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यांत एके-४७, पिस्तुल, ग्रेनेड आणि शस्त्रसाठा जवानांनी जप्त केलाय.
दहशतावादी या भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय रिझर्व्ह पोलीसदल आणि राज्य पोलीसांच्या विशेष ऑपरेशन्स समूहानं शिस्तरगम गावाला चारही बाजुंनी वेढा घातला. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देत जवानांनीही गोळीबार सुरू केला. यात दोन दहशतवादी ठार झाले.