Breaking News: झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंड राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 15, 2024, 04:23 PM IST
Breaking News: झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर title=
Jharkhand Vidhan Sabha Dates

Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंड राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसोबतच हरयाणामध्ये आचार संहितादेखील लागू झाली आहे. 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत.

 

दोन टप्प्यात निवडणूका

झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा 13 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

पहिला टप्पा 

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची संधी आहे. 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

दुसरा टप्पा 

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची छाननी होणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची संधी आहे. 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

मतमोजणीचा निकाल

दोन्ही टप्प्यांची मतमोजणी 23 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून 25 नोव्हेंबरला झारखंड विधानसभेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्रात कधी निवडणूक?

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात असून येत्या काही दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणा आहे.राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.