नवी दिल्ली : जर कोरोनामुळे तुमची नोकरी गेली असेल, तर आणि तुम्ही नवीन जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनी Paytm 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनी 20 हजार फील्ड सेल्स एक्जिक्यूटिव्ह नियुक्त करणार आहे. पेटीएम व्यापाऱ्यांना डिजिटल माध्यम वापरण्यासाठी शिक्षित करण्यासाठी संपूर्ण भारतात फील्ड एक्जिक्यूटिव्ह नियुक्त करणार आहे. यासंबधीची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
फील्ड सेल्स एक्जिक्यूटिव्हची भरती
फील्ड सेल्स एक्जिक्यूटिव्ह पदाच्या कर्मचाऱ्यांना मासिक 35000 रुपये आणि त्याहून अधिक कमाईची संधी असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या पदासाठी इच्छुक उमेदवारांना 10 वी, 12 वी, ग्रॅड्युएट शैक्षणिक पात्रता गरजेचे असणार आहे.
महिलांसाठी प्रोत्साहन
सूत्रांच्या मते, कंपनी जास्तीत जास्त महिलांना या कामासाठी प्रोत्साहन देणार आहे. FSE पेटीएमचे सर्व प्रोडक्ट ज्यामध्ये ऑल इन वन QR कोड्स, POS मशीन, पेटीएम साउंडबॉक्सला प्रमोट करतील. याशिवाय कंपनीचे वॉलेट, युपीआय, पेटीएम पोस्टपेड, व्यापाऱ्यांसाठी कर्ज आणि इंन्शुरन्सचे प्रमोशन करतील.
अप्लाय कसे करायचे
10 वी पास असलेले उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात. उमेदवारांकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. पेटीएम ऍपच्या माध्यमातून या जागांसाठी अप्लाय करता येईल.