मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षात काय घडणार आहे ? याची उत्सुक्तता प्रत्येकालाच आहे. प्रत्येक जण नव्या वर्षाचे संकल्प करताना दिसतोय. 2018 ला निरोप देताना आणि 2019 चं स्वागत करताना काय गमावल? काय कमवायच? याचा लेखाजोखा मांडला जातोय. नव्या वर्षात रेल्वेने प्रवाशांसाठी बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. सरकारने अनेक गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी कमी केलाय. मोबाईल कंपन्यांनी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत. अॅमेझोन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तू खरेदी सूट दिली आहे. यातच सन २०१९ हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. 2019 या नव्या वर्षात 6 जानेवारीपासून 3 सुर्य ग्रहण आणि 2 चंद्र ग्रहण रोमांचक खगोलीय घटनांचे साक्षीदार बनणार आहेत. हे सर्व असलं तरीही नागरीकांना सर्वात महत्त्वाचं काही वाटत असेल तर त्या 2019 वर्षाच्या कॅलेंडरमधल्या सुट्टया आहेत.
कोणती सुट्टी कोणत्या वारी येतेयं ? दिवाळी कधी ? गणपती कधी ? त्याची सुट्टी किती दिवस ? हे सर्व पाहण्याची उत्सुकता सर्वांना असते. यानुसार कामावर रजा टाकण्याचे, विकेंड प्लान तयार होतात. त्यामुळे सुट्टी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 2019 ने सुट्ट्यांच्या बाबतीत सर्वांना आनंद दिलाय असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा रविवारच्या दिवशी सुट्टी आल्याने अनेकांचा हिरमोड होतो. पण राष्ट्रीय सुट्टी ही आठवड्यात मध्येच कधीतरी किंवा रविवारला लागून आल्यास तेवढाच आनंदही होता. कॅलेंडर बघून तस प्लानिंगही केलं जात असतं.
2019 या वर्षात फक्त दोनच सुट्ट्या रविवारी येत असल्यांने भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. यामुळे गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची चंगळ होणार आहे. असे असले तरी दिवाळीसाठी कमी दिवस मिळणार आहेत. नविन वर्षात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणार आहेत. त्यामुळे याची वेगवेगळी सुट्टी यावर्षी तरी मिळणार नाही. असे असल्याने दिवाळी फक्त चारच दिवस असणार आहे. बरं..या सगळ्यात बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे .जोडीदार तयार असेल त्यांना तर मुहुर्तासाठी आणखी एक वर्षे थांबण्याची गरज नसेल. कारण खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षातील नऊ महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.