एप्रिल फूल बनविण्याची सुरूवात कशी झाली ? वाचा रोचक कहाणी

 १ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो?  याबद्दल तुम्हाला माहितेय का ? 

Updated: Mar 31, 2018, 08:51 AM IST
 एप्रिल फूल बनविण्याची सुरूवात कशी झाली ? वाचा रोचक कहाणी  title=

मुंबई : लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. पण १ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो?  याबद्दल तुम्हाला माहितेय का ? एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.

जगभरात १ एप्रिल 

संपूर्ण जगात हा दिवस एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमध्ये पूर्ण दिवस लोक प्रॅंक करत असतात. स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस हा दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला 'फिश डे' असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.