RG Kar Hospital Doctor Murder : कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने चार्जशीट (CBI ChargeSheet) दाखल केली आहे. कोलकाताच्या सियालदह कोर्टात दाखल करण्याता आलेल्या या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. महिला डॉक्टरवर गँगरेप (Gangrape) झाला नव्हता. आरोप संजय रॉयने बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं या चार्जशीटमध्ये नमुद करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी संजय रॉयविरोधात (Sanjay Roy) हत्या आणि बलात्काराचे ( RG Kar Doctor rape Murder Case) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये दोनशे लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. चार्जशीट दोनशहून जास्त पानांची आहे. कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणातील ही पहिली चार्जशीट आहे. पुढच्या तपासानंतर सीबीआय आणखी एक चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. याप्रकरणात सीबीईआयने आतापर्यंतचे सर्व पुरावे आणि साक्षीदारांना कोर्टात हजर केलं आहे. सीबीआय चार्जशीटनंतर महिला डॉक्टरला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
असा पकडला गेला संजय रॉय
नराधम संजय रॉय हा के आरजी कर रुग्णालायात वॉलेंटियर म्हणून काम करायचा. रुग्णालयाचा मुख्य दरवाजावरील सीसीटीव्ही आणि महिला डॉक्टरच्या मृतदेहाशेजारी आरोपी संजय रॉयचं सापडलेलं ब्ल्यूट्यूश डिव्हाईसमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तो मदत करायचा. त्यामुळे रुग्णालयात कधीही ये जा करण्याची त्याला परवानगी होती.
9 ऑगस्टला रात्री एक वाजता आरोपी संजय रॉय एका रुग्णाला दाखल करण्याच्या निमित्ताने रुग्णालयात आला. या रुग्णाची दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया होणार होती. त्याच रात्री रुग्णालच्या मागच्या इमारतीत तो रुग्णाच्या एका नातेवाईकाबरोबर दारू प्यायला. मध्यरात्री 3 वाजता त्याने सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केला आणि तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर अत्याचार केला. यानंतर त्याने महिला डॉक्टरची हत्या केली. जवळपास 40 ते 45 मिनिटांनंतर संजय सेमिनार हॉलमधून बाहेर आला.
संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट
कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केल्यानंतर 25 ऑगस्टला संजयची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्यात आली. यावेळी त्याला सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरची हत्या केल्यानतंर तू काय केलंस? हत्या केल्यानंतर तू कुठे गेला होतास? यावर आरोपी संजय रॉयने सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह पाहिल्यानंतर आपण तिथून पळून गेलो असं उत्तर दिलं, पॉलिग्राप टेस्टमध्ये संजय रॉयने बलात्कार आणि हत्येच्या आरोपाचा इन्कार केला आहे. बलात्कार आण हत्येत आपला कोणताही सहभागी नव्हता असंही संजय रॉयने म्हटलं आहे.