नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत कोलकाता देशाची आर्थिक राजधानी असेल, असं प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा म्हणतायेत.
मुंबईला मागे टाकून कोलकाता आर्थिक राजधानी हीच देशाची आर्थिक राजधानी बनेल. 27 बॅंकांनी बंगालमध्ये जागा घेतल्या असून, त्याच परिसरात स्टेट बॅंक 11 एकरांमध्ये सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र बांधतेय.
एचएसबीसी सारख्या बॅंकेचं सुद्धा कोलकात्यात कार्यालय आहे. त्यातच मनुष्यबळाची उपलब्धता ही आमची ताकद आहे. त्यामुळं आम्ही मुंबईला स्पर्धा निर्माण केलीय.
अर्थसंस्थाचं केंद्र कोलकात्यात मोठ्या प्रमाणावर तयार होत असून बॅंकींग, इन्शुरन्स, म्युचुअल फंड यासारख्या क्षेत्रांची कार्यालयं 100 एकरांपेक्षा जास्त जागेवर पसरलेली आहेत, असं मित्रा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात अमित मित्रा बोलत होते. 2011 पासून बंगालमध्ये 81 लाख लोकांना रोजगार मिळाल्या आहेत. बंगालमध्ये आता उद्योगांसाठी पोषक वातावरण असून आम्ही 15 व्या स्थानावरून 3 ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, असं मित्रा म्हणाले.