नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार का यावरुन चर्चा सुरु होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेस एकत्र आल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीतील ७ लोकसभेच्या एकूण जागांपैकी ३ जागा काँग्रेस तर ३ जागा आप पक्ष लढवणार आहे. तसेच एक जागा ही शत्रुघ्न सिन्हा यांना सोडण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. दोन्ही पक्षाने समसमान जागा वाटून घेतल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे दोन्ही पक्षाचे उमेदवार असतील. सध्या ते भाजपचे खासदार आहेत. आपने याआधी ६ जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केली होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक घेतली. केंद्रीय नेतृत्व या आघाडीसाठी तयार होती पण दिल्लीतील नेत्यांचा याला विरोध होता. पण आता सहमती झाल्य़ाचं सूत्रांचं म्हणणं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर आप आणि काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
याआधी आपने काँग्रेसला फक्त १ जागा देण्याची आपची तयारी होती. किंवा समान जागा दिल्या तर इतर राज्यांमध्ये जागा वाढवून देण्याची आपची दुसरी मागणी होती. सूत्रांच्या माहितीनुसार त्यामुळेच आपने ७ पैकी फक्त ६ उमेदवारांची घोषणा केली होती. एक जागा त्यांना काँग्रेसला सोडली होती.
चांदणी चौक - पंकज गुप्ता
उत्तर पूर्व दिल्ली - दिलीप पांडेय
पूर्व दिल्ली - आतिशी
दक्षिण दिल्ली - राघव चड्ढा
उत्तर पश्चिम दिल्ली - गुग्गन सिंह
नवी दिल्ली - बृजेश गोयल