Uday Samant On Ratnagiri Sindhudurg Constituency: सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याची पोस्ट किरण सामंत यांनी केली होती. किरण सामंत हे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू आहेत. ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी गेल्या अनेक दिवसात मतदारसंघात मोर्चेबांधणीदेखील केली आहे. किरण सामंत यांनी काही वेळातच ही पोस्ट डिलीटदेखील केली होती. दरम्यान उदय सामंत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनेच लढली पाहिजे. शिवसेनेने दावा करण्यामागे लॉजिक आहे. या जागेमुळे शिंदे साहेबांन सह इतर नेत्याना त्रास होत असल्याने किरण सामंत यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती. या जागा वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी भावनिक होत हा निर्णय घेतला मात्र उद्या रत्नागिरीला बैठक घेऊ, असे उदय सामंत म्हणाले.
किरण सामंत यांचा कालचा भावनिक निर्णय होता. आता ती पोस्ट डिलीट केलीय. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, यावर उदय सामंत ठाम आहेत. शिंदे साहेबांनी मला निरीक्षक म्हणून ठेवल आहे. ही जागा शिवसेनेकडे असावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपकडेच राहिलं. मध्ये कोणी लुडबूड करु नये असा इशारा नारायण राणेंनी मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला दिला होता. यावर नारायण राणेंसारख्या मोठ्या भाजपा नेत्याबाबत मी बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया देत उदय सामंत यांनी बोलणे टाळले. 48 जागा येतील असे बावनकुळे सांगत असतील तर त्यांना कॉन्फिडन्स आहे. इतक्या जागा निवडूनपण येऊ शकतात असे ते म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 8 आमदार माझा संपर्कात आहेत. या 8 आमदारांना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट घालून देणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. जागा वाटपचे निर्णय तेच घेतील, असेही सामंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब कि 400 पार होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याची पोस्ट समोर आली. या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल झाले. पण नंतर किरण सामंत यांच्या अकाऊंटवर ही पोस्ट दिसेनासी झाली.
गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी बाबत भाजप आणि शिंदेची शिवसेना यामध्ये दावे प्रतिदावे सुरु होते.शिवसेनेला हा मतदार संघ हवा होता तसा दावा ही केला होता. दरम्यान रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक आता ठाकरे विरुद्ध राणे अशीच होणार अस बोललं जातंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा भाजपचाच असल्याचे सांगून आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही नारायण राणेंच्या नेतृत्वात महायुतीत काम करु असे सामंतांचे विधान समोर आले होते.