बाईकवर प्रेमी युगुलाचा लव सीन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु

चालत्या दुचाकीवर प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल 

Updated: Sep 8, 2021, 04:58 PM IST
बाईकवर प्रेमी युगुलाचा लव सीन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु title=

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये, चालत्या दुचाकीवर प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यानंतर आता पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ भोपाळच्या प्रसिद्ध व्हीआयपी रोडचा आहे. या व्हिडिओमध्ये बाईकच्या टाकीवर एक मुलगी बसली आहे आणि तिचा चेहरा बाईक चालवणाऱ्या तरुणाकडे आहे. तो तरुण बाईक चालवत समोर बसलेल्या मुलीला मिठी मारत आहे. जेव्हा दोघे व्हीआयपी रोडवर चालणाऱ्या कारजवळ पोहोचले तेव्हा कारमधील व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ बनवला.

13 सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कार चालवणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ बनवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाईकवर तरुणासोबत बसलेली तरुणी मोबाईलकडे पाहते आणि नंतर डोके खाली करते.

भोपाळचे एसपी विजयकुमार खत्री म्हणाले की, धोकादायकरीत्या बाईक चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ कधी बनवण्यात आला, कोणी बनवला आणि बाईकवर दिसणारे तरुण -तरुणी कोण आहेत, हे माहित नाही.'

पोलीस आता व्हीआयपी रोडवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून दुचाकीचा नंबर शोधता येईल आणि तरुण आणि तरुणीची ओळख पटेल.