नवी दिल्ली : LPG ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. आता एलपीजी सिलिंडरचे वजन हलके करता येणार आहे. एलपीजी सिलिंडर जड असल्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कठीण होते.
विशेषत: महिलांना गॅस सिलिंडर नेण्यात त्रास होतो. मात्र सिलिंडरचे वजन कमी असेल तर सर्वसामान्यांना सोपे जाईल.
वास्तविक, लोकांच्या सोयीसाठी गॅस सिलिंडर हलका असणे आवश्यक आहे. गॅस सिलिंडर एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावे लागल्यास अडचण निर्माण होते. मात्र महिलांच्या सोयीसाठी सरकार लवकरच एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करू शकते.
विशेष म्हणजे 14.2 किलो घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या वजनामुळे त्याच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. यामुळे महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांचे वजन कमी करण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे.
हेदेखील वाचा - Credit Card च्या कर्जाचा आकडा कमी होत नाहीय? या जाचातून बाहेर येण्याचे 3 उपाय
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यापूर्वी एका सदस्याने जड सिलिंडरमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, 'महिला आणि मुलींनी सिलिंडरचे वजन स्वत: उचलावे अशी आमची इच्छा नाही आणि त्याचे वजन कमी करण्याचा विचार केला जात आहे.'
मंत्री म्हणाले, '14.2 किलो वजन 5 किलोपर्यंत कमी करण्याचा किंवा अन्य मार्गाने आम्ही मध्यम मार्ग काढू. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'.