अयोध्या : भाजपचा अर्थ हिंदुत्व नाही. आम्ही हिंदुत्वापासून नव्हे तर भाजपपासून विभक्त झालो आहोत. भाजप हिंदुत्वापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हिंदुत्व सोडण्याचा प्रयत्न नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. यावेळी त्यांनी राम मंदिर उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे यावेळी जाहीर केले. मी एक भक्त आहे. त्यामुळे या भक्ताकडून ही मदत देण्यात आली आहे, असे ते म्हणालेत.
अयोध्या में महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे: हम बीजेपी से अलग हुए हैं हिन्दुत्व से नहीं। बीजेपी अलग है हिन्दुत्व अलग। pic.twitter.com/GBGeDnPGQP
— ANI_HindiNews (@AHindinews) March 7, 2020
अयोध्या दौऱ्यातदरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नावर बोलताना ही माहिती दिली. मी मंदिरासाठी सरकारकडून नव्हे तर माझ्या ट्रस्टकडून हे एक कोटी जाहीर केले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्येचा तिसरा दौरा आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरयू आरतीला उपस्थित राहणार नाहीत. तसे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचवेळी ते म्हणालेत, मी पुन्हा येणार आहे. तसेच इथे कोणत्याही प्रकारची सभा होणार नाही. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर मी पुन्हा अयोध्येत आलो होतो. आता पुन्हा आलो आहे. ते (भाजप) येथे आलेले नाही. मी यापुढेही येतच राहणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होण्यापूर्वीच इथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल झालेत.
Maharashtra Chief Minister and Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Ayodhya: I am here to seek blessings of Ram Lalla. I have with me today several members of my 'Bhagwa' family. It is my third visit in last 1.5 years. I will also offer prayers today. pic.twitter.com/EUlOrNZtlD
— ANI UP (@ANINewsUP) March 7, 2020