मुंबई : स्मार्टफोन हा प्रत्येक व्यक्तीच्या हातचं खेळणं झालं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण फोन वापरत असतात. सकाळी उठल्या उठल्या लोकांच्या दिवसाची सुरुवात होते ते फोननेच. फोन हातात घेतला नाही तर लोकांना कसंतरीच होऊ लागतं. लोक फोनच्या इतके आहारी गेले आहेत की, त्यांच्यासाठी फोन म्हणजे एक व्यसनच झालं आहे. तुम्ही कोणाकडेही बघा, तुम्हाला असेच दिसेल की, त्या व्यक्तीच्या हाताशी फोन जणू काही बांधला गेला आहे.
चालतानाही अनेकजण फोन चालू ठेवतात. अगदी वॉशरूमपासून ते मार्केटच्या गल्ल्यांपर्यंत सगळीकडे लोकांच्या हातात फोन सुरू असतो. स्मार्ट फोनचे व्यसन इतके वाढले आहे की, लोकांना त्याची काळजी वाटू लागली आहे.
तुम्ही पाहिले असेल की, कार किंवा बाईक चालवतानाही अनेक लोक आपला फोन वापरतात. एवढंच काय तर आज काल खाता पिताना देखील लोक फोन बाजूला ठेवत नाहीत. त्यात रिल्स किंवा शॉट्स हे आता लोकांसाठी इतकं मनोरंजक झालं आहे की, त्यामध्ये लोकांचा तासनतास वेळ कसा निघून जातो, हे कळणार नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या फोनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी त्याच्यासोबत जो प्रकार घडला, तो सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा आहे.
खरंतर हा व्यक्ती फोनमध्ये इतका व्यस्त असतो की, त्याला खाली जाण्याच्या रस्त्यावर झाकण उघडं असतं, हे त्याला दिसत नाही आणि तो तेथे खाली पडतो.
Boy distracted by phone survives fall without a scratch pic.twitter.com/Jp69EAgKWB
— The Sun (@TheSun) June 7, 2022
हा व्हिडीओ पाहाताच लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. नशीबाने या व्यक्तीला काहीही इजा झालेली नाही. परंतु विचार करा, जर या व्यक्तीला एवढ्या उंचावर पडून लागलं असतं, तर त्याला ते किती महागात पडलं असतं.
त्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे समोर आलेलं नाही. पण The Sun या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओकडे तुम्ही एक उदाहरण म्हणून पाहा आणि तुम्हाला देखील अशी सवय असेल, तर ती आत्ता सुधारा.