पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (१७ मार्च) निधन झालं. त्यांच्यावर पणजीतल्या मिरामार बीचवर शासकीय इतमामात अंत्ययसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र उत्पल यानं त्यांना मुखाग्नी दिला. पर्रिकरांना निरोप देण्यासाठी राजकीय विश्वातल्या दिग्गजांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. तर गोव्यातील हजारो नागरिक आणि कार्यकर्ते आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी मिरामार बीचवर जमलेले होते. मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय विश्वातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हाही उपस्थित होत्या. अंत्यदर्शन घेतल्यानंतर मोदींनी मनोहर पर्रिकर यांच्या मुलांचं सांत्वन केलं. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरामार बीचवर उपस्थित होते.
आयआयटी मुंबईमधून पदवी शिक्षण घेतलेल्या पर्रिकरांच्या जाण्याने देशाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. फक्त राजकारणच नव्हे, तर कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतूनही पर्रिकर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पर्रिकर यांच्या निधनानंतर साऱ्या देशातून दु:ख व्यक्त करण्यात येत असून, सोमवार (१८ मार्च) हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
*पार्थिवाच्या अंत्यदर्शनावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अश्रू अनावर
Panaji: Union Minister Smriti Irani gets emotional as she pays last respects to Goa CM #ManoharParrikar. pic.twitter.com/NOOucOU8iO
— ANI (@ANI) March 18, 2019
*पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि इतर नेतेमंडळी पर्रिकरांच्या अंत्यदर्शनासाठी पणजीत दाखल.
Panaji: Prime Minister Narendra Modi and Defence Minister Nirmala Sitharaman pay last respects to Goa CM #ManoharParrikar pic.twitter.com/aNUC7nEJPm
— ANI (@ANI) March 18, 2019
*मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव कला अकादमीच्या दिशेने रवाना
*सायंकाळी चार वाजेपर्तंय पार्थिव कला अकादमीत.
*गोव्याच्या जनतेवर शोककळा. आपल्या माणसाला अखेरच निरोप देण्यासाठी गर्दी
Goa: People gather at BJP office in Panaji to pay last respects to late Goa CM #ManoharParrikar pic.twitter.com/2jQpNMG60R
— ANI (@ANI) March 18, 2019
*मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव भाजपा कार्यालयात पोहोचलं.
Goa: Mortal remains of Goa CM #ManoharParrikar brought to BJP office in Panaji. Union Minister Nitin Gadkari arrives to pay last respects to him. pic.twitter.com/nvg5j1Of4c
— ANI (@ANI) March 18, 2019
*पर्रिकरांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लोटला जनसमुदाय
Goa: Visuals from BJP office in Panaji. Mortal remains of Goa CM #ManoharParrikar will be brought here for people to pay last respects to him. pic.twitter.com/zSHGEZqwBu
— ANI (@ANI) March 18, 2019
*पर्रिकरांचं पार्थिव रवाना
*सायंकाळी पाच वाजता मिरामार येथे होणार अंत्यसंस्कार
* गोव्यातील सर्व न्यायालये आज बंद ठेवण्याचा निर्णय
#Goa: High Court of Bombay at Goa and District Courts in the state to remain closed today in view of passing away of Goa CM #ManoharParrikar.
— ANI (@ANI) March 18, 2019
*पर्रिकरांच्या निवासस्थानाबाहेरील दृश्य
Visuals from outside the residence of #ManoharParrikar in Panaji, Goa. pic.twitter.com/5M6lzmaVWv
— ANI (@ANI) March 18, 2019
*पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्रिकरांच्या अंत्यसंसंकारांसाठी गोव्यात उपस्थित राहणार
*अकरा ते चार या वेळेत जनतेने त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
*अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वसामान्य जनतेला पर्रिकरांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.
*पर्रिकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजपा कार्यालयात नेण्यात येणार.
*राष्ट्रध्वज अर्ध्यावरच फडकणार
*गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर. राज्यात सोमवारी होणाऱ्या बारावीच्या परीक्षाची तारिख पुढे ढकलली.