हेलवूड : मांसाहार म्हणजेच ऩॉनवेज खाणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेमधून जाऊन ऩॉनवेज खाण एका व्यक्तीला चांगलच महागात पडलंय. या घटनेत अवघ्या काही तासातच त्याचा जीव गेला. या घटनेने त्याच्या कुटूंबियांवर शोककळा पसरलीय.
युकेच्या हेलवूड येथे राहणारे मार्टिन पीटर वेअर (26) हेलबँकमधील मर्सी व्ह्यू पब्लिक हाऊसमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेले होते. यावेळी जेवण करत असताना त्याच्या घशात मटणाचा तुकडा अडकला. हा तुकडा अडकल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने विस्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानचं त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.
प्रकरणाची कोर्टात सुनावणी?
दरम्यान या घटनेनंतर मार्टिनच्या मृत्यूची कायदेशीर चौकशी करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते. 15 ऑगस्ट रोजी सेफ्टन कोरोनरच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की, मार्टिनला एका आजाराने ग्रासले होते, त्यामुळे त्याला अन्न गिळण्यास त्रास होत होता. या प्रकरणाशी संबंधित मृत्यूचा तपास करणार्या जोहाना थॉम्पसन यांनी सांगितले की, गुदमरणे हे अंदाजे किंवा हेतुपुरस्सर नव्हते. त्यामुळे हा अपघातच मानला पाहिजे.
दरम्यान या घटनेनंतर नॉनवेज खाणाऱ्या वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नॉनवेज खाणाऱ्या शक्यतो जपून जेवण करावे. अन्यथा त्यांना सुद्धा या घटनांचा धोका आहे.