सारा तेंडुलकरच्या हातावर कोणाची मेहंदी रंगतेय..सोशल मीडियावर फोटो व्हायरल.. लग्नाचा लेहेंगा आहे..

 ....'माय सिस्टर इस गेटिंग मॅरीड' 

Updated: Aug 5, 2022, 08:41 PM IST
सारा तेंडुलकरच्या हातावर कोणाची मेहंदी रंगतेय..सोशल मीडियावर फोटो व्हायरल.. लग्नाचा लेहेंगा आहे..  title=

SARA TENDULAKAR:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेन्सेशन आहे तिचे चाहते लाखोंमध्ये आहेत. तिच्या एका एका फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. नुकताच सारा तेंडुलकरने मेहेंदी काढतानाचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केलाय यात सारा कमालीची सुंदर दिसतेय साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हातावर मेहेंदी काढताना दिसतेय 

पहा कोणाच्या नावाची मेहेंदी काढतेय सारा 

खरतर हा फोटो पाहून सगळीकडे चर्चा होतेय की सारा नेमकी कोणाच्या नावाची मेहंदी काढतेय,काय निमित्त असेल,तर स्वतः सारानेच याचा खुलासा केला आहे. 

साराने केला खुलासा 

साराने जो फोटो पोस्ट केला आहे त्यात ती एकटी नाहीये तिच्यासोबत आणखी एक मुलगी आहे आणि या फोटोला साराने कॅप्शन दिलय कि 'माय सिस्टर इस गेटिंग मॅरीड' म्हणजेच हे फोटो तिच्या बहिणीच्या लग्नातले आहेत,बहिणीच्या लग्नासाठी साराने हातावर सुंदर मेहेंदी काढली आहे आणि ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सारा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल अशा चर्चा तर होत आहेत मात्र अद्याप तरी तशी काही ठोस माहिती नाहीये पण सारा तेंडुलकर मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे वेगवेगळे फोटोस ती सोशल मीडिया अकाऊंटवर टाकत असते.नुकताच साराचा ब्रायडल,गुलाबी लेहेंग्यावरचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता ज्यात सारा एखाद्या नववधूप्रमाणे सुंदर दिसत होती

 सारा बरयाचदा लंडन आणि मुंबई येत-जात असते तिथले काही फोटो ती अपलोड करते या सर्व फोटोंमध्ये पाहिलं तर सारा तेंडुलकर कोणाही बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीये.साराचे इंस्टाग्राम वर 2 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत .