मुंबई : स्त्रिया या मनातील सगळ्याच गोष्टी फार सहज बोलून जातात. पण...
पुरूषांचा तसा स्वभाव नसतो. अनेकदा पुरूष बऱ्याच गोष्टी मनात ठेवतात. पण काही वेळा असं होतं ते नको बोलायचं तेच बोलून जातात. आणि सगळा गोंधळ होऊन बसतो. अशा वेळी पुरूषांनी नेमक्या कोणत्या ४ गोष्टी टाळाव्यात याचा देखील विचार करावा. यासाठी चाणक्य नितीमध्ये खास त्या ४ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या पुरूषांनी जरूर वाचाव्यात.
१) एखादे मोठे नुकसान झाले असेल तर त्याविषयी जास्त चर्चा करू नका. कारण ही गोष्ट सर्वांना समजल्यास तुम्हाला आर्थिक मदत पुढे कुणी करणार नाही. पैशाची मदत कायम अशाच लोकांना केली जाते जे पहिल्यापासूनच सक्षम असतात.
२) प्रत्येक घरामध्ये पती - पत्नीमधली वाद हे सामान्य बाब आहे. अशा वादाची चर्चा घराबाहेर करू नका. पुरूषाने स्त्रीच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी गुपीत ठेवाव्यात. पत्नीशी संबंधित कोणतीही चर्चा इतर लोकांसमोर केल्यास भविष्यात तुम्हाला याचा भरपूर मोठा फटका बसू शकतो.
३) पुरूषांनी आपल्या मनाचा संताप म्हणजे दुःख कोणासमोरही उघड करू नये. या गोष्टीमुळे कोणताही लाभ होत नाहीच शेवटी समाजात तुमचे हसे होते. असे समाजात अनेक लोक आहेत ज्यांना इतरांचे दुःख पाहून सुख मिळते.
४) आचार्य सांगतात की, जीवनात आपल्याला एखाद्या नीच व्यक्तीमुळे अपमानित व्हावे लागले तर ती घटना गुपितच ठेवावी. अपमानाशी संबंधित घटन समाजात सांगितल्यास आपण हास्याचा विषय बनतो.