विकृतीचा कळस! भुंकला म्हणून तरुणाचा कुत्र्यासह मालकावर हल्ला

कुत्रा भुंकला म्हणून तरुण चिडला, लोखंडी रॉडने मालकावर जीवघेणा हल्ला  

Updated: Jul 4, 2022, 05:22 PM IST
विकृतीचा कळस! भुंकला म्हणून तरुणाचा कुत्र्यासह मालकावर हल्ला title=
फोटो सौजन्य- ANI

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये धक्कादायक बातमी आहे. विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. कुत्रा भुंकला म्हणून चक्क एका व्यक्तीनं कुत्र्यासह त्याच्या मालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला आहे. याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. 

लोखंडी रॉडनं कुत्र्यासह त्याच्या मालकाला एका व्यक्तीनं बेदम मारहाण केली. कुत्रा भुंकल्याच्या रागातून हा धक्कादायक प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीनं आधी कुत्र्याच्या डोक्यावर जोरात रॉड मारला. कुत्रा खाली कोसळला. त्यानंतर मालकावरही हल्ला केला. कुत्रा थोडावेळानं उठून पुन्हा भुंकायला लागला. 

कुत्रा अंगावर भुंकल्याच्या रागात एका व्यक्तीनं कुत्र्यासोबत विकृत्य कृत्य केलं आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार भागातील ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 3 जणं जखमी झाले आहेत. तर कुत्राही जखमी झाला आहे. 

या प्रकरणी पीडितांनी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.