मुंबई : वयाची ३०-३५ वर्षे नोकरी किंवा व्यवसाय करुनही अनेकांकडे निवृत्तीच्यावेळी जगण्यासाठी पैसे नसतात. कारण करिअरच्या सुरुवातीला गरजेच्या असणाऱ्या सेव्हिगवर ते लक्ष देत नाहीत.
सेव्हिंग करण्याचा सुवर्ण काळ आपण वाया घालवतो. त्याचवेळी सेव्हिंगची प्लानिंग होणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला असे ५ गोल्डन रुल्स सांगत आहोत ज्यामुळे निवृत्तीसाठी तुम्ही चांगली रक्कम ठेवू शकता.
आपल्या मासिक पगाराच्या १० टक्के रक्कम गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. हा निवृत्ती प्लानिंगचा पहिला नियम आहे. आता तुम्हाला ही रक्कम कदाचित कमी वाटेल पण कालांतराने कम्पाऊंडींग पॉवरने याचे मोठ्या रक्कमेत रुपांतर होते. तुम्ही नोकरी करत नसाल तर १० टक्के मोठ्या अवधीसाठी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवून ठेवायला हवेत.
पगार वाढला कि मौजमज्जा, सुखसोईच्या वस्तू वाढतात पण ही वेळ गुंतवणुक वाढविण्याची असते. वाढत्या पगाराप्रमाणे दरवर्षी आपली गुंतवणूक वाढायला हवी. यामुळे महागाईपासून तुम्ही सुरक्षित राहू शकाल.
जेव्हा तुम्ही नोकरी सोडता तेव्हा निवृत्ती प्लानिंगचा प्रश्न उभा राहतो. यावेळी पीएफ काढण्याचा किवा ट्रांसफर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यावेळी बरेचजण पीएफ काढून गरजा पूर्ण करतात. खुपच निकड नसेल तर पीएफ काढू नका.
आई-वडिल आपल्या मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी सेव्हिंग करत असतात. सध्याच्या काळात बॅंकेमधून शैक्षणिक कर्ज सहज उपल्बध होते. जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेत आहात तर त्याचा कोणताच परिणाम तुमच्या निवृत्तीच्या प्लानिंगवर होणार नाही.
तुमच्या निवृत्ती प्लानिंगवर कोणती गदा येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर एमरजंसी फंड नक्की बनवा. एमरजंसी फंड तुमच्या मासिक पगाराच्या पाच टक्के असला पाहिजे. जर काही काळासाठी तुमची नोकरी गेली तर सहजरित्या तुम्हाला खर्च संभाळता येऊ शकतो. तुमच्या निवृत्ती प्लानिंगवरही याचा परिणाम होणार नाही.