मुंबई : वाहन क्रमांक आणि नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे जेणेकरून अंकांचा रंग, त्यांचा वेगवेगळा वर्ग आणि वाहनांच्या श्रेणीच्या नोंदणी पाटीचा मागील भाग स्पष्ट होईल, अशा प्रकारे त्यांची मांडणी करावी लागणार आहे.
ही अधिसूचना केवळ स्पष्टता सक्षम करण्यासाठी देण्यात आली आहे आणि पाट्यांबाबत नव्याने काहीही सांगण्यात आलेले नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवर नोंदणी चिन्हांनी नेमणूक या प्रकरणातील विसंगती सुधारण्यासाठी १४ जुलै २०२० रोजी, कार्यालयीन आदेश २३३९ (ई) ही अधिसूचना जारी केली आहे.
अंकांचा रंग, त्यांचा वेगवेगळा वर्ग आणि वाहनांच्या श्रेणीच्या नोंदणी पाटीचा मागील भाग स्पष्ट होईल, अशी मांडणी करावी अशी अधिसूचना केवळ स्पष्टतेसाठी देण्यात आली आहे
This notification has been issued only for enabling clarity, and nothing new has been prescribed for the plates
— PIB in Maharashtra ( PIBMumbai) July 16, 2020
यापूर्वी १२ जून १९८९ रोजी कार्यालयीन आदेश ४४४(ई) नुसार, मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या १९८८ (१९८८ च्या ५९) च्या कलम ४१ मधील पोटकलम (६) अन्वये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवर वेगवेगळे नोंदणी चिन्ह निर्धारित करून दिले होते.
त्यानंतर, मंत्रालयाने विस्तारित कार्यालयीन आदेशनुसार, गाड्यांच्या प्रकारानुसार, दर्जानुसार त्यांचे अल्फा क्रमांक आणि नोंदणी क्रमांकाच्या पाटीचा रंग निर्धारित केला होता. पुढे, मंत्रालयाने विस्तारित सामान्य कार्यालयीन नियम ९०१ (ई) १३ डिसेंबर २००१ नुसार, वाहनांच्या परिवहन आणि बिगर परिवहन वर्गासाठी नोंदणी पाटीचा रंग निर्धारित केला होता.
या प्रकरणातील दुरुस्ती मंत्रालयाच्या निदर्शनास आली, ते पाहता विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवरील नोंदणी चिन्हे कार्यालयीन आदेश जारी केले होते. ज्यामधील काही अस्पष्टता लक्षात आल्या. त्यामुळे स्पष्टता सक्षम करण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.