Sanjay Raut On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. का महिन्यात त्यांची भूमिका बदलतेय हे आश्चर्य आहे, अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आलेले आहेत. बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे या राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिन शर्ट पाठिंबा दिला होता. शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजींनी तेव्हा हे सांगितलं होतं, असा टोला राऊतांनी लगावला होता.
हाराष्ट्रावरती फार काय उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय, ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला यातच सगळं आलं. आता एका महिन्यात त्यांची भूमिका बदलतेय आणि ते आता 288,225 काय त्या जागा लढणार आहेत हे आश्चर्यकारक आहे, असंही राऊत म्हटले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांनी ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही, काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहे, अशी टीकादेखील राऊतांनी केली आहे.