मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा...; सूचना सेठचा नवा दावा

Murder Of Startup CEOs Son: सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 10, 2024, 06:48 PM IST
मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा...; सूचना सेठचा नवा दावा title=
Murder Of Startup CEOs Son Cough Medicine Bottles Found In Room says police

Suchna Seth Latest Update: बेंगळुरुमध्ये एका एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. मात्र, सूचना तिच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. मी मुलाची हत्या केलीच नाही, असा दावा तिने केला आहे. मात्र तिच्या या दाव्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही.

मंगळवारी सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील एका आपार्टमेंटमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी सूचनाला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याचबरोबर जी ज्या रुममध्ये राहत होती त्या रुमची झडतीही घेतली आहे. यादरम्यान पोलिसांना खोकल्याच्या औषधांच्या दोन बॉटल सापडल्या आहेत. मात्र, या बॉटल रिकामी होती. त्यामुळं पोलिसांना संशय होता की सूचनाने मुलाला औषधाची जास्त मात्रा देऊन त्याची हत्या केली.  शवविच्छेदनाच्या अहवालानुसार श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.  

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेने मुलाला खोकल्याच्या औषधाची अधिक मात्रा दिली होती. सर्व्हिस अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याच्या चौकशीनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. महिलेने एका कर्मचाऱ्याला खोकल्याच्या औषधाची छोटी बॉटल आणायला सांगितली होती. त्यामुळं आधी मुलाला औषधाची अधिक मात्रा देण्यात आली त्यानंतर उशीने किंवा चादरीने त्याचा गळा घोटून त्याची हत्या करण्यात आली. हा एख सुनियोजीत कट असल्याची शक्यता आहे, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. 

दरम्यान, सूचना सेठ हिने हत्येचा आरोप नाकारला आहे. महिलेने दावा केला आहे की, ती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा मुलाचा आधीच मृत्यू झाला होता. मी त्याची हत्या केलेली नाही, असं तिने म्हटले आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, तिच्या दाव्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. पूर्ण तपासणी झाल्यानंतर हत्येचा कारण समोर येणार आहे. 

सूचना आणि तिच्या पतीमध्ये वाद आहेत. ते दोघही वेगळे राहतात त्यातूनच हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सूचनाने 6 जानेवारी रोजी सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये रुम बुक केली होती. तिथे ती दोन दिवस राहिली. त्यानंतर सोमवारी टॅक्सीने बेंगळुरु येथे गेली. मात्र, त्याचवेळी पोलिसांना संशय आला आणि तिला ताब्यात घेण्यात आले. सूचनाला अटक केल्यानंतर गोव्यातील मापुसा शहरातील कोर्टाने मंगळवारी दिला सहा दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.