मुंबई : केंद्र सरकारकडून जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना काळात देशातील अब्जाधिशांच्या संख्येत घट झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणने मंगळवारी संसदेला दिलेल्या माहितीनुसार, आयकर रिटर्न (income tax return) मध्ये घोषित केलेल्या उत्पन्नानुसार भारतातील अब्जाधिशांच्या संख्येत 2019-20 मध्ये 141 वरून ही संख्या कमी झाली असून 2020-21 मध्ये 136 पर्यंत पोहोचली आहे.
निर्मला सीतारम यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 100 करोड रुपये किंवा त्याहून अधिक ग्रॉस टोटल इनकम (Gross Total Income) असलेल्या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 आहे. 2019-20 मध्ये ही संख्या 141 वर होती. तर 2018-19 मध्ये ही संख्या 77 वर होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, तीन असेसमेंट वर्षामध्ये आयकर विभागात फाइल केलेल्या आयकर रिटर्नमध्ये 100 करोड रूपयांहून अधिक उत्तपन असलेल्या लोकांची नोंद झाली आहे. ही संख्या 2020-21 मध्ये 136 रुपये आहे. यावर प्रश्न विचारण्यात आला होता की, लॉकडाऊनमध्ये देशातील अब्जाधीश लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाले की, डायरेक्टर टॅक्स महत्वाचं आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपत्ती कर (Wealth Tax) ला एप्रिल 2016 मध्ये समाप्त केलं. यामुळे CBDT कोणत्याही व्यक्तिगत टॅक्सपेअर्सच्यी पूर्ण संपत्तीबाबत कोणतीच सूचना आलेली नाही. कोरोनाकाळात श्रीमंतांच्या संपत्ती घट झाली असेल तर मग जनसामान्यांचं काय? कोरोनाकाळ सर्वांसाठीच कठीण ठरल्याचं समोर आलं आहे.