मुंबई : व्हर्च्युअल करंसी बिटकॉइनची किंमत ६ दिवसात ३.५७ लाख रुपयांनी वाढून ५.२० लाख रुपये झाली आहे.
याचा अर्थ सरळ आहे, जर एखाद्याने यात गुंतवणुक केली असती तर त्याच्या भांडवलामध्ये केवळ ६ दिवसात १.६३ लाख रुपयांची वाढ झाली असती.
बिटकॉइन प्राइस इडेक्सच्या मते, याच्या एका युनिटची किंमत ८ हजार डॉलर (५.२० लाख) च्या स्तरावर पोहोचली आहे.
प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, पुढच्या एका महिन्यात बिटक्वाईन १० हजार डॉलरच्या स्तरावर पोहोचू शकते. दरम्यान जगातील कोणत्याच देशाने या करंसीला मान्यता दिलेली नाही.
इंग्रजी वेबसाइट 'सीएनबीसी' या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार, बिटकॉइनची किंमत $ 10,000 पर्यंत पोहोचू शकते.
म्हणजेच भारतीय चलनात यांची किंमत ६.५ लाख रुपये इतकी होते.
जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांनी बिटकॉइनला फ्रॉड म्हटले होते. तर मॉर्गन स्टेनलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स गौरमन यांनी या विधानावर असहमती दर्शवली होती.
दरम्यान रिझर्व्ह बॅंक लवकरच क्रिप्टो चलनातील प्रवाहाच्या बाजूने निर्णय घेऊ शकते.
बिटकॉइन हे चलन जगाभरात सर्वात महागडे चलन मानले जाते. ऑनलाइन गेमिंग क्विझचे पूर्ण केल्यानंतर हे आपल्याला बिटकॉइन मिळतात.
तसेच पैसे देऊन बिटकॉइन खरेदी केले जाऊ शकतात. भारतामध्ये बिटकॉईन हे https://support.buysellbitco.in/support/home येथे या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
वित्तीय व्यवहारांसाठी बिटकॉइन हे सर्वात जलद आणि कार्यक्षम चलन मानले जाते. दरम्यान जगभरातील कम्प्यूटर्समध्ये व्हायरस पाठवूनही खंडणी मागण्याचे काम बिटकॉइन मार्फत केले जात आहे.
काळा पैसा, हवाला घोटाळा, ड्रग्सची खरेदी, कर चुकवणे आणि अतिरेकी कारवायांमध्ये बिटकॉइन चा अतिवापर झाल्याने हा चर्चेत राहिला.
बिटकॉइनच्या वाढत्या वापरामुळे सुरक्षा एजंसींची झोप उडाली आहे.
आपल्याकडे रिझर्व बॅंक किंवा कोणत्याही कायद्याने या व्हर्च्युअल चलनाला मान्यता दिली नाही.